पुण्यात राजा परांजपे जन्मशताब्दी महोत्सव

April 15, 2010 2:00 PM0 commentsViews: 46

15 एप्रिलमराठी चित्रपटातील दिग्गज व्यक्तिमत्व राजा परांजपे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने पुण्यात राजा परांजपे जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे अभिनेते सचिन पिळगावकर यांनी उद् घाटन केले. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायक सलिल कुलकर्णी आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांना राजा परांजपे तरुणाई सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, अभिनेत्री सीमा देव, दिग्दर्शक राजदत्त, चित्रा रेखा, उपस्थित होते. 14 ए‌प्रिलपासून 20 एप्रिल पर्यंत सुरू असणार्‍या या महोत्सवात हा माझा मार्ग एकला, ऊनपाउस, पुढचं पाऊल, पडछाया असे राजाभाऊंचे अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत.तर समारोपाच्या दिवशी 20 तारखेला ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना राजा परांजपे सन्मान देण्यात येणार आहे.

close