विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड

April 15, 2010 2:11 PM0 commentsViews: 5

15 एप्रिलबोगस पदव्या आणि गुणपत्रिकांचा वापर टाळला जावा, यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी बंधन घालण्यात येईल, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत केली. राज्यातील 5 विद्यांपीठांमधील पदव्या आणि गुणपत्रिका बनावट असल्याची 1 हजार 618 प्रकरणे समोर आली आहेत. त्यात 42 प्रकरणे शिवाजी विद्यापीठातील होती. सरकार सर्व विद्यापीठांच्या पदवीधारक विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यास बंधन घालेल. नोकरी देणार्‍या कंपन्या ठराविक शुल्क भरुन ऑनलाईन वैधता विद्यापीठांकडे तपासू शकतील, असेही टोपे म्हणाले.

close