औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये पूल कोसळला, दोघे गंभीर जखमी

September 5, 2016 9:55 PM0 commentsViews:

Aurangabad123

05 सप्टेंबर : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील निजामकालीन पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. यामध्ये दोन जण गंभीर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सिल्लोड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हा पूल आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी एक महिन्यापूवच्च संबंधित विभागाला पत्र लिहिलं होतं, अशी माहिती त्यांनी दुर्घटनेनंतर दली. दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर दुरुस्ती करु, असं आश्वासनही दिलं होतं. सुट्‌ट्या असल्यामुळे रस्त्यावरुन वाहतूक कमी होती. त्यामुळे सुदैवाने यात मोठी जिवीतहानी टळली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा