पत्रकारांवरील हल्ल्यांबाबत निर्णय घेणार

April 15, 2010 2:16 PM0 commentsViews: 1

15 एप्रिलपत्रकारांवरील हल्ल्यांबाबत येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केल आहे. विधानसभेत गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. पुण्यात काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याबाबत आमदार गिरीश बापट यांनी औचित्याचा मुद्दा मांडला. त्याला उत्तर देताना आर. आर. पाटील यांनी हे उत्तर दिले. तसेच याबाबत कायदा करण्याचाही सरकार विचार करत आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

close