टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा मुंबईत संप सुरू

October 16, 2008 7:03 AM0 commentsViews: 11

16 ऑक्टोबर, मुंबई -शरद राव यांच्या टॅक्सी युनियन आणि रिक्षा ड्रायव्हर्सचा आज मुंबईत संप सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीला विरोध, राज्य सरकारने पंचवीस वर्षापूर्वीच्या टॅक्सी-रिक्षा बंद करण्याचा निर्णयाला विरोध करण्यासाठी, महागाईनुसार भाडेवाढ देण्यात यावी यासाठी तसंचआपल्या विविध मागण्यांसाठी टॅक्सी- रिक्षा ड्रायव्हर आजपासून संपावर जाणार आहेत. या संपामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या संपात मुंबईतल्या पंचावन्न हजार टॅक्सी आणि नव्वद हजार रिक्षा ड्रायव्हर्स सहभागी होणार असल्याचं मुंबई कामगार संघटनेचे अध्यक्षशरद राव यांनी सांगितलं. तर शरद राव यांच्या युनियनच्या संपामध्ये, मुंबईतले टॅक्सी ड्रायव्हर सहभागी होणार नसल्याचं, टॅक्सी युनियनचे महासचिव ए एल कॉड्रोस यांनी सांगितलं आहे.या दोन युनियनच्या अंतर्गत वादामुळे मुंबईकरांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

close