ना’पाक’ हल्ले सुरूच, पूँछमध्ये पाककडून गोळीबार

September 6, 2016 8:55 AM0 commentsViews:

kashmir_attack06 सप्टेंबर : भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले असताना आता सीमेवरही तणाव निर्माण झालाय. सोमवारी मध्यरात्री पाक लष्करानं सीमेवर गोळीबार केला. भारतीय लष्करानंही याला चोख प्रत्युत्तर दिलं. काश्मीर खोऱ्याच्या पूँछ सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी गोळीबाराला सुरुवात झाली. यात कुणी जखमी झाल्याचं वृत्त नाहीय. अजूनही गोळीबार सुरूच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा