सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची एक वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या

September 6, 2016 9:57 AM0 commentsViews:

बुलडाणा, 06 सप्टेंबर : जिल्ह्यात एका विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून आपल्या एक वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केली. विहिरीत उडी घेऊन तिनं आपलं जीवन संपवलं. मेहकर तालुक्यातल्या बदनापूर गावातली ही घटना आहे.buldhana_news

मेहकर तालुक्यातील बदनापूर येथील संगीता रवींद्र गाडे असं या मृत महिलेचं नाव आहे. संगीताला चार वर्ष अगोदर मुलगी झाली होती आणि ह्या वर्षी सुद्धा मुलगीच झाल्याने तिच्या सासरचे तिचा अमानुष छळ करत असत. नेहमी तिला टोमणे दिले जात होते आणि मारहाण सुद्धा केली जात होती. या सर्व प्रकाराला कंटाळून संगीता दोन दिवसापूर्वी आपल्या श्‌्ा्रावणी या एका वर्षाच्या चिमुकलीसह घरून निघून गेली होती. तिचा शोध घेतल्यानंतर ती कुठंच मिळून आली नाही. पण काल तिचा मृतदेह चिमुकलीसह गावाच्या विहिरीमध्ये आढळून आल्यामुळे  गावात एकच खळबळ उडाली आहे. संगीताच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला विरहित ढकलून तिचा खून केल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी संगीताच्या घरच्याच्या तक्रारीनुसार सासरच्या मंडळी विरुद्ध कलम 498 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पण संगीताने आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे याचा तपास पोलीस करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा