राहुल गांधींच्या ‘खाट पे चर्चा’चा फज्जा, लोकांनी पळवल्या खाट !

September 6, 2016 3:22 PM0 commentsViews:

06 सप्टेंबर : निवडणुकीच्या प्रचारासाठी कल्पक योजना करावी आणि त्याचा झालेला विचका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पाहावा लागला. उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातल्या रुद्रपूरमध्ये झालेल्या ‘खाट पे चर्चा’चा अक्षरश: विचका करण्यात आला. सभेनंतर खाटांची एकच पळवापळवी झाली. या खाटा नेण्यासाठी लोकांमध्ये झोंबाझोंबीही झाली. लोकं सभेच्या ठिकाणच्या खाटा डोक्यावर घेऊन पळत होते. तर आयोजक फक्त हाताशपणं पाहत होते. ‘खाट पे चर्चा’ घेण्याची काँग्रेसची आयडियाची कल्पना त्यांच्याच अंगाशी आलीये.rahul_gandhi_khat

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधींची आज पासून उत्तर प्रदेशात किसान यात्रा सुरू केली .याची पहिली सभा उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर पार पडली.यावेळी राहुल गांधी यांनी ‘खाट पे चर्चा’ म्हणजेच लोकांमध्ये खाट टाकून त्यांच्याशी थेट संवाद सादला. जवळपास 300 खाट यासाठी टाकण्यात आल्या होत्या. मात्र ही सभा झाल्यानंतर लोकांनी त्या खाटा पळवण्यास सुरुवात केली.या खाटा घेण्यासाठी अक्षरश: लोकांमध्ये मोठी रस्सीखेच झाली.

दरम्यान, बिचोलिया येथील शेतकऱ्यांच्या पैशांवर का डल्ला मारण्यात आला. तुम्ही शेतकऱ्यांच्या रक्षणाची ग्वाही दिली होती. पण शेतकऱ्यांना सोडून उद्योजकांना कोट्यवधींचं कर्ज माफ केलं अशी टीका राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर केली. तसंच आमचं सरकार होतं त्यावेळी 70 हजार कोटी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. मग तुम्ही शेतकऱ्यांशी वीजचं बिल कमी का करत नाही असा सवाल उपस्थिती केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा