दंतेवाडा हल्ल्याचा अहवाल 24 एप्रिल रोजी

April 15, 2010 3:01 PM0 commentsViews:

15 एप्रिलछत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा चौकशी अहवाल 24 किंवा 25 एप्रिलला सादर करू, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी आज लोकसभेत जाहीर केले. या हल्ल्यात 76 जवानांचा बळी गेला होता. हे जवान बंदुकीच्या गोळया लागून मृत्यूमुखी पडले. लँडमाईन किंवा प्रेशर बॉम्बचा वापर नक्षलवाद्यांनी केला नाही, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. जवानांनी अतिशय धीराने नक्षलवाद्यांचा मुकाबला केला. या हल्ल्यात 8 नक्षलवादीही ठार झालेत. पोस्ट मार्टेम आणि फॉरेन्सिक अहवालाचा अभ्यास सध्या सुरू आहे. असेही चिदंबरम म्हणाले. हा अहवाल आल्यानंतरच या ऑपरेशनमध्ये काय चुका झाल्या ते कळेल, असेही चिदंबरम यांचे म्हणणे आहे. नक्षलवाद ही सामाजिक, आर्थिक समस्या आहे, हे आम्हाला मान्य आहे. गेल्या 30 वर्षात तिथे प्रगती पोहोचली नाही. त्यासाठी आम्हीच जबाबदार आहोत, अशी कबुलीही त्यांनी दिली. या भागातील दारिद्र्य निर्मूलनावर जास्त काम करू, असे आश्वासन त्यांनी यानिमित्ताने दिले. सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माझा राजीनामा नामंजूर केला, असेही चिदंबरम यावेळी म्हणाले.

close