केंद्राकडून 26 सिंचन प्रकल्पांसाठी 12 हजार कोटी

September 6, 2016 9:49 PM0 commentsViews:

5chitale_report_maharashtra irrigation scam

06 सप्टेंबर : राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पांचे काम निधीअभावी  रखडले होते. मात्र, आता नाबार्ड आणि केंद्र सरकारमध्ये राज्यातील 26 सिंचन प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून या करारांतर्गत राज्याला 12 हजार 773 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात केंद्र सरकार आणि नाबार्डमधील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या बैठकीला उपस्थित होते.

प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत देशभरातील 99 अपूर्ण प्रकल्पांना निधी देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील 26 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. नाबार्डकडून देण्यात येणाऱ्या या कर्जाची मुदत 15 वर्षांची असून यासाठी 6 टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.

नाबार्डकडून देशभरातील प्रकल्पांसाठी एकूण 77 हजार 595 कोटी रुपयांचं कर्ज देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातील 12 हजार 773 कोटींचा निधी एकट्या महाराष्ट्राला मिळणार आहे. तसंच राज्याला 3 हजार 830 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देखील मिळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा