शैलेंद्र गायकवाड यांना हटवले

April 15, 2010 6:00 PM0 commentsViews: 1

15 एप्रिलआयपीएलमधील कोची टीमवरून गदारोळ सुरूच आहे. पण त्या दरम्यान कोची टीमनेही संचालक मंडळात महत्त्वाचे बदल केले आहेत. शैलेंद्र गायकवाड यांना सीईओ पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी केशव टी यांची नियुक्ती झाली आहे. तर हर्शद मेथा टीमचे नवे अध्यक्ष असणार आहेत. मेथा हे रोझी ब्ल्यू कंपनीचे मालक आहेत.मोदींवर आरोप सुरूचरॉन्देवू ग्रुपने ललित मोदी यांच्यावर थेट आरोप करणे सुरूच ठेवले आहे. आणि त्यावर आता ललित मोदी यांनीही कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. रॉन्देवू स्पोर्ट्स वर्ल्डवर मानहानीचा दावा ठोकण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यासाठी वकिलांशी त्यांची सल्ला मसलतही सुरु आहे. रॉन्देवू स्पोर्ट्सचे प्रवक्ते सत्यजीत गायकवाड यांनी मोदींवर लाच देऊ केल्याचा आरोप केला होता. कोची टीमसाठी लावलेली बोली मागे घेण्यासाठी मोदी यांनी पाच कोटी डॉलर्सची लाच देऊ केली, असे गायकवाड काल म्हणाले होते. त्यावरुन मोदी खवळलेत. बीसीसीआयच्या काही पदाधिकार्‍यांनाही हा आरोप रुचलेला नाही. आणि कोची टीम रद्द करण्यावरही बीसीसीआयमध्ये विचार सुरू आहे.

close