पोलिसांच्या सुरक्षेप्रश्नी उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

September 7, 2016 9:13 AM0 commentsViews:

20devendra-uddhav07 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांसह आज ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. पोलिसांवर वारंवार होत असलेले हल्ले थांबवण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर पोलिस कुटुंबियांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी पोलिसांच्या कुटुंबियांनी आपली व्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली होती. हे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा योग्य पाठपुरावा करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलं होतं. हेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी उद्धव आज सकाळी दहा वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा