मरा नाहीतर बुडा, ग्राहकांना आधी घर द्या, सुप्रीम कोर्टाने बिल्डर्सना फटकारलं

September 7, 2016 9:36 AM0 commentsViews:

court_buldiers07 सप्टेंबर : तुम्ही बुडता की मरता याच्याशी काही देणं घेणं नाही, अगोदर ज्यांनी घरं घेतलेत, त्यांना एक तरी घरं द्या नाही तर त्यांचे पैसे परत करा अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने बिल्डर्सना चांगलंच फटकारलंय.

नोएडामध्ये अनेक बिल्डर्सनी ग्राहकांकडून घराचे पैसे घेतलेत पण त्यांना ना घरं दिलीयत ना त्यांचे पैसे परत केले. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी त्याच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. मात्र, घरांचे पैसे परत करायला जवळ पैसेच नसल्याचा दावा बिल्डर्स करतायत. त्यावर सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेत, तातडीनं पैसे भरण्याचे आदेश दिले आहे.

एवढंच नाहीतर सुपरटेक बिल्डर्सला सुप्रीम कोर्टाच्या रजिस्टारकडे पंधरा कोटी रूपये डिपॉजिटही करायला सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मुंबईतल्या बिल्डर्सनाही लागू होतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close