आजीबाई नंबर 1 !, वयाच्या 93 वर्षी सरपंचपदी

September 7, 2016 12:24 PM0 commentsViews:

खेड, 07 सप्टेंबर : राजकारणात वयाला मर्यादा नसते याचे जिवंत उदाहरण पुणे जिल्ह्यातील खेड इथं पाहण्यास मिळालं. ग्रामपंचायत निवडणुकीत वयाच्या 93 वर्षी गंगुबाई भांबुरे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहे. 93 वर्षांच्या या सरपंचबाईंची मिरवणूकही मोठ्या थाटातमाटात काढण्यात आली होती.

 gangu_baiखेड तालुक्यातील भांबुरवाडी गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या गावातील 93 वर्षांच्या गंगुबाई भाबुरे या आजी विजयी झाल्यात. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपद हे महिलांसाठी राखिव होतं. रिंगणात बलाढ्य राजकीय घराण्यातील महिला उभ्या असताना गंगुबाईंनी सर्वांना चितपट करत सरपंचपदी बसण्याचा मान मिळवलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत गंगुबाई भांबुरे यांना 863 मत मिळाली. त्यांनी शारदा भांबुरे या 31 वर्षीय उमेदवाराला 353 मतांनी पराभूत केलं.

तरुण वयात अनेक तरुण तरुणी आपलं राजकीय भविष्य आजमवण्यासाठी राजकारणात येतात आणि बक्कळ पैसा खर्च करून आपण किती सक्षम आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र भांबुरवाडीतील गंगुबाई वयाच्या 93 व्या वर्षी सरपंच झाल्यामुळे काहीसा वेगळा प्रकार पहायला मिळालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा