मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टाटा सुमोला भीषण अपघात, 2 ठार

September 7, 2016 1:16 PM0 commentsViews:

sumo407 सप्टेंबर : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगात निघालेल्या टाटा सुमोने सिमेंटचा कठडा तोडून नाल्यात कोसळल्याने 2 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत.

मुंबईच्या दिशेनं निघालेल्या सुमो  चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने कार मुंबई आणि पुणे या दोन्ही मार्गिकांच्या मध्ये असणाऱ्या गार्डनमधील नाल्याचा सिमेंट कठडा तोडत नाल्यात कोसळली. आज सकाळच्या सुमारास तुंगार्ली गोल्ड व्हॅलीजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींमध्ये 1 पुरुष, 2 महिला, 2 मुले आणि एका मुलीचा समावेश असून ते सर्वजण गोरेगाव मुंबई येथील असल्याचं कळतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा