मोदींची आठ तास चौकशी

April 16, 2010 8:50 AM0 commentsViews: 1

16 एप्रिलआयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांची इन्कम टॅक्स अधिकार्‍यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत चौकशी केली. तब्बल आठ तास त्यांची चौकशी झाली. यानंतर आयपीएलच्या सर्व टीम्सच्या लिलावाबद्दलची कागदपत्रे आपण जमा केल्याचे आयटी अधिकार्‍यांनी सांगितले. लिलावाची प्रक्रिया नक्कीच पारदर्शक नसल्याची शंका आपल्याला येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतर टीममालकांचीही चौकशी होऊ शकते, असे संकेत आयटी विभागाने दिले आहेत. मोदींच्या ऑफीसमधील हार्ड डिस्कचीही तपासणी केली जाणार आहे. यावेळी ललित मोदी यांना पुढील प्रश्न विचारण्यात आले…आयपीएल टीम्सच्या लिलावांच्या प्रक्रियेचा तपशील आयपीएल व्यवहारातल्या छुप्या रकमेबाबत विचारणा स्पॉन्सरशिपशिवाय आयपीएलच्या फंडिंगचे दुसरे सोर्स कोणते?

close