रॅम्बो सर्कसमधल्या पिसाळलेल्या हत्तीला पकडण्यात यश

September 7, 2016 4:12 PM0 commentsViews:

Pimpri elephant13

07 सप्टेंबर : पिंपरी चिंचडवड इथल्या भोसरी गावातील रॅम्बो सर्कसमधल्या पिसाळलेल्या हत्तीला पकडण्यात अखेर यश आलं आहे.

पिसाळलेला हत्ती गर्दी असलेल्या रस्त्यावर उधळल्यानं नागरिकांची धवपळ उडाली होती. रॅम्बो सर्कसमधील हा हत्ती सकाळच्या सुमारास त्याच्या माहूताच्या नियंत्रणाबाहेर गेला. याबाबतची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी तब्बल चार तासांपासून पोलीस, मनपाचे कर्मचारी आणि सर्कसमधील कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल 4 तास धुमाकुळ घातल्यानंतर हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱ्यांना यश मिळालं आहे.

दरम्यान, हा हत्ती का पिसाळलेला होता, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा