पंजाब आणि डेक्कन चार्जर्सचा सामना

April 16, 2010 9:10 AM0 commentsViews: 3

16 एप्रिलआज आयपीलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि डेक्कन चार्जर्स एकमेकांना भिडणार आहेत. किंग्ज एलेव्हन याअगोदरच सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.पण डेक्कन चार्जर्ससाठी ही मॅच महत्वाची ठरणार आहे. ही मॅच जिंकल्यास त्यांना सेमीफायनल गाठण्याची संधी आहे. तर आजची मॅच ही एका नव्या कोर्‍या स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीलमध्ये पहिल्यांदाच हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेमध्ये मॅच रंगणार आहे. त्यामुळे धर्मशाळेचे पीच हे दोन्ही टीम्ससाठी नवीन असणार आहे. म्हणूनच या मॅचमध्ये टॉस महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर धर्मशाळेला अजून एक महत्वाची घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएल स्पर्धा वादात अडकली आहे. त्यामुळे आयपीएल आणि बीसीसीआय अधिकार्‍यांमध्ये धर्मशाळेत बैठक होणार असल्याचे समजते. त्या बैठकीसाठी बीसीसआयचे अध्यक्ष शशांक मनोहर तसेच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे उपाध्यक्ष शरद पवार तसेच आयपीएलचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

close