बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा

April 16, 2010 10:24 AM0 commentsViews: 7

16 एप्रिलसुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज आझाद मैदानात सीमाभागातील हजारो कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आर . आर. पाटील यांनी या आंदोलकांची भेट घेतली.बेळगाव, कारवारचा मराठी भाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी केंद्राकडे मागणी करणारा ठराव पुढच्या अधिवेशनात आम्ही मांडणार आहोत. अधिवेशन संपल्यानंतर यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहोत, असे आर. आर. यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तर आम्ही सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहोत. बेळगावचा लढा आणखी तीव्र करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा मराठी भाषकांना सर्वाधिक त्रास देत आहेत, अशी टीका भुजबळ यांनी केली. विरोधकांचाही पाठींबासीमावासीयांच्या या आंदोलनाला विरोधकांनी पाठींबा जाहीर केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह 865 गावांचा मिळून केंद्रशासित प्रदेश निर्माण करावा, अशी भूमिका भाजपने प्रथमच घेतली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनी या भूमिकेचा जाहीरपणे उच्चार केला. गेले वर्षभर शिवसेनेकडून ही मागणी केली जात आहे. आता भाजपनेही आपल्या मित्रपक्षाच्या सुरात सूर मिसळला आहे. तर मनसेनेही सीमावासीयांच्या या लढ्याला पाठींबा जाहीर केला आहे.यानिमित्ताने सर्व सभागृह सीमा भागातील जनतेच्या पाठीशी असल्याचा ठराव विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला.

close