राजधानी, दुरांतो, शताब्दीच्या तिकीटदरांमध्ये 10% वाढ

September 7, 2016 10:12 PM0 commentsViews:

Suresh-Prabhu

07 सप्टेंबर :  शताब्दी, राजधानी आणि दुरांतो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे प्रशासन 9 सप्टेंबरपासून फ्लेक्सी फेअर सिस्टीम लागू करणार असल्याने प्रवाशांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या नवीन फ्लेक्सी फेअर सिस्टीम धोरणांतर्गत 10 टक्के सीट सोडून उर्वरित सिटांसाठी प्रवाशांना दीड पट भाडे जास्तीचे द्यावे लागतील. हे नवीन नियम 9 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, ज्या प्रवाशांनी 9 सप्टेंबरच्या अगोदर तिकीटची नोंदणी केली आहे अशा प्रवाशांना प्रवासादरम्यान अतिरिक्त पैसे भरावे लागतील असेही रेल्वेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close