एक्स्प्रेस वेवर वाहनं सुसाट, 3 हजार वाहनांनी ओलांडली वेगाची मर्यादा

September 7, 2016 10:27 PM0 commentsViews:

पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर होणारे अपघात टाळण्यासाठी अनेक प्रयत्न सध्या सुरु आहेत. ड्रोन, सीसीटीव्ही असे कॅमेरे एक्सप्रेस वे वर सर्वेक्षणासाठी लावण्यात आलेत. या कॅमेऱ्यांनी टिपलेली निरीक्षणं धक्कादायक आहेत. मंगळवारी रात्रीपासून  बुधवारी दुपारपर्यंत 3 हजार 110 वाहनांनी 80 किमी प्रति तास या कमाल वेगमर्यादेचं उल्लंघन केलंय.

Pune-Mumbai-Expressway-Drone

एक्स्प्रेस वे च्या नियंत्रणासाठी मळवलीला एक छोटेखानी कमांड सेंटर उभारण्यात आलंय. यामध्ये तिन्ही कॅमेऱ्यांचं आउटपुट दिसतंय. तर एका मॉनिटरवर वाहनं किती वेगाने जातायत याची नोंद केली जाते.  गाडीच्या नंबर प्लेटसहीत नोंदीचे फोटो रेकॉर्ड केले जातायत. या यंत्रणेमुळे एकूण किती वाहनं गेली ? किती वेगाने गेली  ? कुठे अपघात झालाय का ? याबद्दलच्या नोंदीवर लक्ष्य ठेऊन कारवाई करता येणं शक्य होणार आहे . त्यासाठी 93 किमी च्या मार्गावर 145 कॅमेऱ्यांची गरज आहे.

एक्सप्रेस वे वर कॅमेऱ्यांची नजर

  • 16 तासांत एकूण 3 हजार170 वाहनं गेली.
  • या वाहनांपैकी 3 हजार 110 वाहनांचा वेग 80 किमी च्या वर
  • 10 वाहनं 120 किमी प्रतितासपेक्षा अधिक वेगाने गेली.
  • 8 वाहनं 150 किमी प्रतितासपेक्षा अधिक वेगाने गेली.
  • 174 किमी प्रति तास इतक्या सर्वाधिक वेगाने एक बीएमडब्लू गेली.
  • बीएमडब्लूचा क्रमांक MH 14 FG 4070
  • बीएमडब्लू 11वाजून 41 मिनिटांनी गेली.

प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या चाचणीत सर्वेक्षण आणि नियमांचं उल्लंघन तपासणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळालंय. या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याची यंत्रणा उभारण्यात आली तर एक्स्प्रेस वे वर होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करता येऊ शकेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close