24 तासाच्या आत एफआयआर ऑनलाईन!

September 8, 2016 8:57 AM0 commentsViews:

fir_online08 सप्टेंबर : पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात किंवा तुम्ही कुणाच्याविरोधात एफआयआर दाखल केली असेल किंवा करणार असाल तर त्याची कॉपी आता 24 तासाच्या आत ऑनलाईन पहायला मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य सरकारांना तसा आदेश दिलाय. 15 नोव्हेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करा असंही कोर्टाने निर्देश कोर्टाने दिले. पण लैंगिक शोषण, देशद्रोह, दहशतवादाच्या केसेस मात्र या निर्णयातून वगळण्यात आल्या आहे.

कुठल्या केसेस संवेदनशिल आहेत हे ठरवण्याचा अधिकार कोर्टानं डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्यांना दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयानं पारदर्शकता येण्यासाठी मोठी मदत होईल असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. सध्यस्थितीत एफआयआरची कॉपी मिळवण्यासाठी आरोपींना मोठी अडचण येते. ती आता दूर होईल असं असं दिसतंय. ज्या डोंगरी भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तिथं एफआयआरची कॉपी अपलोड करायला 48 तास देण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा