आयफोन आला भारी ; दोन कॅमेरे, हेडफोन जॅकच नाही !

September 8, 2016 9:24 AM0 commentsViews:

07 सप्टेंबर : मोबाईल मार्केटमध्ये दादा कंपनी असलेल्या अॅपलने आपले दोन शानदार, जबरदस्तच असे फोन लाँच केले आहे. आम्ही अॅपल का आहोत हे त्यांनी या दोन फोनवरुन सिद्ध केलंय. एकाच फोनमध्ये दोन कॅमेरे, वायरलेस एअरपॉडस् आणि हेडफोन जॅकची अतिरिक्त जागाच या फोनमध्ये नसणार आहे.

अॅपलचा फोन जेव्हा लाँच होतो, तेव्हा जगभर चर्चा होते. आयफोन 7 आणि 7 प्लस आज लाँच झाले. अपेक्षेप्रमाणेच यात फीचर्सच फीचर्स आहेत. काही नेव प्रयोग आहेत आणि किंमतही भरपूर आहे. 7 ऑक्टोबरपासून हे दोन्ही फोन्स भारतात मिळतील. किंमत असेल 60 हजार रुपये. पण  ही किंमत आहे आयफोन 7ची किंमत. 7 प्लस तर आणखी महाग असेल. आयफोन 7चं सर्वात मोठं फीचर म्हणजे तो वॉटर आणि डस्ट रेस्टस्टंट आहे.

त्यामुळे खुशाल पाण्यात भिजा तुमच्या आयफोनला काहीही होणार नाही. दुसरं म्हणजे कॅमेरामध्येही अनेक सुधारणा आहेत. आयफोन 7 प्लसमध्ये दोन कॅमेरे देण्यात आले. एक वाईड कॅमेरे आणि एक नाॅर्मल कॅमेरा. तर आयफोन 7 मध्ये नेहमीप्रमाणे एकच कॅमेरा देण्यात आलाय.

हेडफोनचा पोर्ट यातून काढून टाकण्यात आलाय. त्यामुळे गोंधळू नका, हेडफोन लावण्यासाठी आपण जिथे चार्जर लावतो, तिथेच हेडफोन लावायचे.ज्यांच्याकडे 35 एमएमचे हेडफोन्स आहेत, त्यांच्यासाठी बाजारात अॅडॅप्टर मिळेल, तो स्वतंत्र विकत घेऊन वापरावा लागणार आहे.

अॅपलने आयफोन 7 आणि 7 प्लससोबत नव्या वॉचही लाँच केल्या आहे. विशेष म्हणजे आयफोन 7 ची किंमतही 60 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे आयफोन 7 च्या खालच्या सिरीजमध्ये फोन सर्वसामान्याच्या आवाक्यात हाती लागतील अशी शक्यता आहे.

 कसा आहे आयफोन 7?
- किंमत : 60 हजारांपासून सुरुवात
- रंग : ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्वर, गोल्ड आणि रोज गोल्ड
- स्टोअरेज – 32 जीबी,128 जीबी, 256 जीबी
- स्क्रीन – 4.7 इंच (आयफोन 7 प्लस 5.5 इंच)
- वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट
- होम बटणमध्ये सुधारणा, टच सेंसिटिव्हिटीचा आधार
- स्मार्ट कॅमेरा
- सुधारित लेन्स, फोटोमध्ये व्यक्ती आणि वस्तूमधला फरक कॅमेराला कळतो
- 7 प्लसमध्ये 2 कॅमेरे. एक नॉर्मल, दुसरा टेलिफोटो कॅमेरा
- हेडफोन जॅक नाही
- वायरलेस एअरपॉडस्‌चा पर्याय
- अॅपल 10 फ्युजन प्रोसेसर
- 2 तास अधिक बॅटरी लाईफ


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा