गंगाराम गवाणकरांचं ‘व्हाया वस्त्रहरण’ पुस्तक प्रकाशित

October 16, 2008 8:42 AM0 commentsViews: 6

16 ऑक्टोबर, मुंबई – वस्त्रहरणसारखा देशी फार्स लिहिणारे गंगाराम गवाणकर यांच्या 'व्हाया वस्त्रहरण' या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं.यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते. व्हाया वस्त्रहरण या गंगाराम गवाणकर लिखित पुस्तकाचं प्रकाशन मधु मंगेश कर्णिक यांच्याहस्ते प्रकाशन झालं. मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, विजया वाड या दिग्गजांच्या उपस्थितीने गंगाराम गवाणकरभारावून गेले होते. वस्त्रहरणला लाभलेल्या यशाप्रमाणेच 'व्हाया वस्त्रहरण'लाही यश लाभो, अशा शुभेच्छा यावेळी सगळ्यांनी दिल्या.

close