गडचिरोलीत जवानांनी केली विघ्नहर्त्याची स्थापना

September 8, 2016 12:01 PM0 commentsViews:

gadchiroli_bappa08 सप्टेंबर : गणेशोत्सवाचा उत्साह अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात पोलीस बेस कॅम्पवरही दिसून येतोय. जवान आणि पोलिसांनी आपल्या बेस कॅम्पच्या पोलीस ठाण्यात गणरायाची स्थापना केलीये.

माओवाद्याविरोधी मोहिमेत कुटूंबियापासून दूर असलेले पोलीस, तसंच राज्याच्या कोल्हापूर, मुंबई, धुळ्यापासूनचे  राज्य राखीव दलाच्या जवानांनीही जिल्ह्यातल्या चाळीसपेक्षा जास्त बेस कॅम्प आणि पोलीस ठाण्यात गणरायाची स्थापना केली आहे. कुटूंबियापासून शेकडो
किलोमीटर दूर राहुनही जवान गणेशोत्सव साजरा करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close