तब्बल 31 हजार छोटे बाप्पा साकारणारा अवलिया !

September 8, 2016 12:10 PM0 commentsViews:

ganpati_nashikनाशिक, 08 सप्टेंबर : गणपतीत बाप्पाच्या मूर्तीबद्दल श्रद्धा,असणं एक गोष्ट आहे, मात्र ही श्रद्धा जेव्हा छंद म्हणून समोर तर तेव्हा काय होत ते तुम्हाला नाशिकच्या सिन्नरमध्ये संजय क्षत्रिय या अवलिया गणेश भक्तांने पाव इंचापासून ते तीन इंचापर्यंतच्या तब्बल 31 हजार गणेश मूर्ती साकारल्या आहे.

या छोट्या बाप्पांमध्ये आकारात ढोल आणि बासरी वादन, पोथीआणि पुस्तकाचे वाचन करणाऱ्या गणेशाच्या कौशल्यपूर्वक निर्मित केलेल्या नानाविध छटा दिसतात इतकेच नव्हे तर, 51 वेगवेगळे मुकूट परिधान करणारे तसंच 10 थर रचून दहीहंडी फोडण्यास सज्ज झालेले श्रीगणेश आपल्याला येथे दिसतात. गणेशाभोवती फेर धरून वाद्यवादन करणारे मूषक..अतिशय चिमुकल्या अशा हजारो गणेश मूर्ती बनवून अभिनव पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणारे सिन्नरचे मूर्ती कलाकार संजय क्षत्रिय यांचे सर्वत्र कौतुक होतंय. इमारतींना रंगकाम करण्याच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा ते नाविण्यपूर्ण गणेश मूर्ती निर्मितीत गर्क होतात. गणेश उत्सव काळात त्यांनी त्यांच्याच घरी या गणेश मूर्तीचे प्रदर्शन भरवले आहे. गणेशाच्या या हजारो विविध रूपातील छटा पाहून गणेश भक्तही मंत्रमुग्ध होतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा