विहिरीत पडलेल्या उंटाची सुटका

April 16, 2010 11:19 AM0 commentsViews: 9

16 एप्रिलजवळपास 30-32 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाशिममध्ये 35 फूट खोल विहिरीत पडलेल्या उंटाला बाहेर काढण्यात यश आले आहे. काल वाशिमहून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या तामसी गावालगतच्या शेतातील विहिरीत हा उंट पडला होता. गावकर्‍यांनी प्रयत्न करून या उंटाला सुखरूप बाहेर काढले. पिण्याच्या पाण्याच्या शोधात हा उंट विहीरीकडे आला होता. गुजरातहून आलेला उंट एका गुजराती मेढंपाळाचा होता. सकाळी 6 वाजता हा उंट अर्धवट बांधकाम झालेल्या विहीरीत पडला. दुपारी 2 वाजता प्रशासनाला याबाबत कळवण्यात आले. मात्र संध्याकाळपर्यंत कोणतीही मदत करण्यात आली नाही. उलट उंट काढण्यासाठी अधिकार्‍यांनी 5 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप या उंटमालकाने केला.

close