नथुराम गोडसे शेवटपर्यंत संघस्वयंसेवक – सात्यकी सावरकर

September 8, 2016 5:03 PM0 commentsViews:

gandhi and nathuram

07 सप्टेंबर : महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे शेवटच्या श्वासापर्यंत संघाचेच स्वयंसेवक होते. ते संघातून कधीच बाहेर पडले नव्हते, असा खुलासा नथुराम यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी केला आहे.

महात्मा गांधींची हत्या करण्यामागे संघाचाच हात होता. संघानेच नथुराम यांना गांधीजींची हत्या करण्यास भाग पाडलं होतं, असा आरोप काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर सत्यकी यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

सत्यकी म्हणाले, नथुराम गोडसे हे शेवटपर्यंत संघाचेच कार्यकर्ते होते. त्यांनी कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नाही. तसंच संघानेही नथुराम यांना दूर लोटलं नव्हतं. नथुराम यांची दोन्ही भावंडेदेखील स्वयंसेवक होते. नथुराम यांनी 1932 साली संघात दाखल झाले. त्यांच्याकडे संघात बौद्धीक कार्यवाहची जबाबदारी होती.

महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनीच केली होती. मात्र, या कृत्यासाठी संघाला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे. संघाने आदेश दिले म्हणून नथुराम यांनी हत्या केली नव्हती. 1942ला त्यांनी हिंदु राष्ट्र दल हे स्वतंत्र दल स्थापना केली होती. मात्र त्यांनी संघाचा राजीनामा दिला नव्हता. पण,  गांधी हत्येसाठी सरसंघचालक आणि संघाला यात जबाबदार धरू नये, त्यांची जबाबदारी नथुराम गोडसेंनी स्वत: वर घेतलीयअसं सत्यकी सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे. नथुराम गोडसे यांचे नातू सत्यकी सावरकर यांनी केलेल्या या खुलाश्याने संघाच्या अडचणीत आणखीण वाढ झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा