इस्रोच्या महत्त्वाकांक्षी इन्सॅट – थ्री DR चं यशस्वी प्रक्षेपण

September 8, 2016 9:18 PM0 commentsViews:

isro-satellite-launch-696x453

08 सप्टेंबर :  भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’नं आज हवामानासंबंधी नेमकी माहिती देणाऱ्या इन्सॅट थ्री DR या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथून  GSLV – F05 या प्रक्षेपक यानातून संध्याकाळी 4.50 वाजता हा उपग्रह सोडण्यात आला आणि पुढच्या 17 मिनिटांत तो त्याच्या कक्षेत प्रस्थापित झाला.

हवामानासंबंधी अचूक अंदाज वर्तवण्यासाठी या उपग्रहाचा फायदा होणार आहे. या उपग्रहाचं वजन 2 टन इतकं आहे. इस्रोच्या या प्रयोगाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे, जीएसएलव्ही-एफ05 या प्रक्षेपकामध्ये देशात तयार केलेल्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता. उपग्रह अवकाशात घेऊन जाणाऱ्या यानात स्वदेशी बनावटीचं इंजिन वापरलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा