कपिल शर्मा सर्व माहिती द्या, कडक कारवाई होईल, मुख्यमंत्र्यांनी दिलं चौकशीचे आदेश

September 9, 2016 10:18 AM0 commentsViews:

CM Deven09 सप्टेंबर : कपिल शर्माने मुंबई महापालिकेवर 5 लाखांच्या लाच मागितल्याच्या आरोप केल्यानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी तातडीने दखल घेतली.  सर्व माहिती द्या, मी पालिकेला शक्य तेवढी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. आम्ही दोषींना सोडणार नाही असंही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय

मुंबईच्या अंधेरी भागात कपिलला ऑफिस थाटायचं आहे. त्यासाठी त्यानं एक बंगला विकत घेतलाय. तिथे बांधकामाच्या परवानगीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केलाय. एकदा लाच दिल्याचंही कपिल यांनी म्हटलंय. पण तसं करूनही त्यांचं काम होत नाहीय.

मुख्यमत्री फडणवीसांचं ट्विट
“कपिलभाई, कृपया सगळी माहिती द्या. पालिका आयुक्तांना मी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. दोषी व्यक्तीला आम्ही सोडणार नाही.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा