पैसे मागणार्‍या आमच्या पदाधिकार्‍याचा पुरावा द्या अन्यथा…-संदीप देशपांडे

September 9, 2016 12:24 PM0 commentsViews:

09 सप्टेंबर : कपिल शर्माने ज्या कुण्या अधिकाऱ्याने लाच मागितली आहे. त्याने त्या अधिकाऱ्यांची नाव जाहीर करावी आणि आमच्या कोणत्या पदाधिकाऱ्याने पैसे मागितले त्याचे नावही जाहीर करावे उगाच हवेत आरोप करू नये असं प्रत्युत्तर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी दिलंय. जर कपिल शर्माचा दावा खोटा ठरला तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड दमच देशपांडेंनी भरला.mns_on_kapil

कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यावर 5 लाखांची लाच मागण्याचा आरोप केलाय. आयबीएन लोकमतशी बोलताना कपिल शर्माने मनसे आणि शिवसेनेच्याही उल्लेख केला. शिवसेना आणि मनसेचे काही पदाधिकारी पैसे मागून काम करून देता असं आश्वासन दिलं होतं अशी माहिती दिली. मनसेचा उल्लेख झाल्यामुळे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे चांगलेच खवळले. कपिल शर्माला कुणी पैसे दिले, का दिले ? हे त्यालाच माहित नाही. मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी पैसे ते जाहीर करा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कारवाई करेल आणि जर तुमचा दावा खोटा ठरला तर मनसे स्टाईलने धडा शिकवू असा इशाराच देशपांडेंनी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा