पत्नी, मुलीसह पित्याची आत्महत्या

April 16, 2010 1:16 PM0 commentsViews: 4

16 एप्रिलभाईंदरमधील रामचंद्र अपार्टमेंटमध्ये डिजेन गांगुली यांनी केल्याची घटना घडली आहे. यात डिजेन आणि त्यांची पत्नी माधुरी गांगुली यांचा मृत्यू झाला आहे. तर मुलगी श्वेता गांगुलीला उपचारासाठी भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गांगुली कुटुंबीयांची मोठी मुलगी सुवर्णा गांगुलीचा ब्लड कॅन्सरने 15 तारखेला मृत्यू झाला. सुवर्णाच्या उपचारासाठी डिजेन गांगुली यांना आपले घर विकावे लागले. तसेच कंपनीकडून मिळालेले व्हीआरएसचे पैसेसुद्धा तिच्या उपचारासाठी त्यांनी खर्च केले. पण तिचा जीव ते वाचवू शकले नाही. यामुळे निराश होऊन त्यांनी पत्नी आणि लहान मुलीसह विष पिऊन आत्महत्या केली.

close