कपिलनेच 16 फूट जागा बळकावली,’ट्विट’गिरी भोवणार ?

September 9, 2016 2:52 PM0 commentsViews:

09 सप्टेंबर : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा आता आपल्याच आरोपामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कपिलने मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांवर 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप केला खरा पण कपिलने त्याच्याच बंगल्या मागची 16 फूट जागा बळकावल्याचं समोर आलंय. पालिकेनं कपिलला नोटीस बजावली असून त्या अधिकाऱ्यांची नाव मागवली आहे. तर भाजपचे नेते राम कदम यांनी तर बीकेसी सायबर सेलकडे तक्रारही दाखल केली आहे.KAPIL_HOME_CONT

कपिल शर्माने आज आपल्याला ऑफिस उभारण्यासाठी 5 लाखांची लाच मागितली असं ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली. एवढंच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिवट् करून हेच का अच्छे दिन ? असा सवालही उपस्थिती केला. कपिलच्या या ट्विटमुळे एकच गोंधळ उडाला. पालिकेनं पत्रकार परिषद घेऊन आपल्याकडे याबद्दल याची माहिती नसून कपिल शर्माकडूनच त्या लाचखोर अधिकाऱ्यांनी नाव मागवले आहे अशी माहिती दिली.

पण कपिल शर्मा आपल्याच आरोपामुळे आता वादात अडकलाय.अंधेरीतील म्हाडा कॉलनीच्या रो हाऊस प्लॉट नंबर 72 या
राहत्या बंगल्यात मागची 16 फूट जागा बळकावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जागेवर बांधकामही सुरू झालं होतं. पालिकेनं याबद्दल 16 जुलैला काम थांबवण्याची नोटीसही बजावली होती. पालिकेनं केवळ तळमजला बांधण्याची परवानगी दिली असताना कपिलने पहिला मजलाही बांधला. पालिकेनं नोटीस देऊन सुद्धा बांधकाम थांबलं नाही. उलट हे अनधिकृत बांधकाम तोडल्यामुळेच कपिल शर्मा नाराज झाला होता.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपिलच्या टिवट्ची तातडीनं याची दखल घेत कारवाईचं आश्वासन दिलं. तुम्ही पूर्ण माहिती द्या, दोषी व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनीनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या टिवट्नंतर या प्रकरणावर पडदा पडेल. पण तसं झालं नाही. त्यात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतलीय. मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेत कपिलला लक्ष केलं. मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्याने पैसे घेतले तर नाव जाहीर करा आणि जर तसं नसेल तर मनसे स्टाईलने धडा शिकवू असा इशाराच दिला.

यावादात भाजपचे आमदार राम कदम यांनीही या प्रकरणात उडी घेतली. कपिल शर्माला लाच मागितली आणि त्याने याआधीही 5 लाखांची लाच दिली तर त्याने याबद्दल यापूर्वी तक्रार का केली असा सवाल उपस्थिती केला. आपल्याला अधिकारी लाच मागताय याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये का केली नाही ? असा प्रश्नही कदम यांनी उपस्थिती केला. याविरोधात कदम यांनी बीकेसी सायबर सेलला तक्रार केली आहे.

तर नितेश राणे यांनी या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. मुंबईत असे अनेक कपिल शर्मा आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील का असा सवाल नितेश यांनी केलाय. सर्व सामान्या मुंबईकरांनाही कपिललाच आपल्या तक्रारी मांडायची विनंती करावी लागेल. तर मुख्यमंत्री दखल घेतील असा आरोपीही नितेश यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा