सनातनच्या आश्रमात संमोहनासाठी औषधांचा प्रयोग

September 9, 2016 4:01 PM0 commentsViews:

sanatan sansthaपनवेल, 09 सप्टेंबर : सनातनच्या साधकांसाठी आश्रमात संमोहनासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचा प्रयोग करण्यात आल्याचं उघड झालंय. सनातनच्या पनवेलच्या आश्रमातून संमोहनाशी निगडीत 20 बॉक्सेस औषधं जप्त करण्यात आली असून ती एच आणि एच 1 गटातली आहेत.

वीरेंद्र तावडेच्या तपासादरम्यान एसआयटीने पनवेल आश्रमातून दोन दिवसांपूर्वी औषधी जप्त केली होती. ही औषध चेता संस्थेवर परिणाम करते. याचा सनातनच्या साधकांवर संमोहनाचा प्रयोग केला जायचा. यासंदर्भात सरकारी वकिलांनी कोल्हापूर कोर्टात माहिती दिलीेये. त्यामुळे ही औषधं अधिकृतरित्या आणि डॉक्टरांच्या परवानगीनं वापरण्यात येत होती का ? यावर अधिक तपास सुरू आहे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा