गणेश विसर्जनावर जेली फिशचं सावट

September 9, 2016 5:28 PM0 commentsViews:

jelly fish1231

09 सप्टेंबर :  मुंबईत गणेशाच्या विसर्जनावर जेली फिशच सावट आहे. फिशरीज विभागाने मुंबई महानगर पालिकेला दिलेल्या अहवालानुसार गिरगाव आणि दादर परिसरात जेली फिश आढळली असल्याने पालिकेला सर्वतोपरी काळजी घेण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

जिथे जिथे समुद्र किनारी विसर्जन होतात अशा ठिकाणी माशांचा वावर आहे का? हे तपासून पाहण्याची विनंती पालिकेने केली होती. त्यानंतर मालाड, जुहू, गिरगाव आणि दादर या परिसराची तपासणी करून दादर आणि गिरगाव इथे हे मासे आढळल्याचा अहवाल पालिकेला देण्यात आला होता.

दोन वर्षांपूर्वी जेली फिश, स्टिंग रे आणि ईल या माशांनी दंश केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक समुद्रकिनारी लोकांनी विसर्जनासाठी स्वत: जाणयापेक्षा नेमलेल्या स्वयंसेवकांकडे मूर्ती सोपवावी असा आवाहन महापालकेकडून करण्यात आलं होत. पण असं असलं तरी जे आपल्या बाप्पाचं आपणच विसर्जन कराव या हट्टापायी समुद्रात उतरतात, अशा सगळ्यांनी काळजी घेणं गरजेच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा