इंजीनियरला मारहाण करणार्‍या नगरसेवकाला कोठडी

April 16, 2010 1:39 PM0 commentsViews: 2

16 एप्रिलइंजीनिअरला मारहाण केल्या प्रकरणी पिंपरी- चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य सूरदास गायकवाडला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.पिंपरी कोर्टाने ही कोठडी दिली आहे. महापालिकेचे इंजीनियर विठ्ठल महाडीक यांना गायकवाडने काल बेदम मारहाण केली होती. पोलिसांनी रात्री गायकवाड यांना अटक केली होती. यानंतर आज सूरदास गायकवाडला जामीन मिळाला. अगदी आयुक्तांच्या अंगावरही पण राष्ट्रवादीचे नगरसेवक धावून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

close