…तर कपिल शर्माला मुंबईत शुटिंग करू देणार नाही – मनसे

September 9, 2016 8:11 PM0 commentsViews:

amey khopkar13

09 सप्टेंबर : अभिनेता कपिल शर्माने पालिका अधिकाऱ्यांवरील लाचखोरीच्या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांवर मध्यस्थीचे आरोप करणाऱ्या कपिल शर्मानेलाचखोरीच्या आरोपाचे आणि त्यात मनसेनं मध्यस्थी केल्याचे पुरावे द्या, नाहीतर मुंबईत शूटिंग करू दिलं जाणार नाही, असा इशारा मनचिसेने दिला आहे.

 IBN लोकमतशी बोलताना कपिलनं शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा आरोप केला होता. त्यावरून सेना-मनसेचे नेते खवळले आहेत. त्यावर मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कपिल शर्मांचा समाचार घेतला.

कपिल शर्मा यांनी योग्य पुरावे न दिल्यास त्यांना मुंबईत शूटिंग करू दिलं जाणार नाही, असं खोपकर यांनी ठणकावलं. कपिल शर्मा यांच्या ऑफिसचं बांधकाम जिथे करण्यात आलंय, तिथे खारफुटीचं जंगल होतं. ते तोडून बांधकाम करणं हाही गुन्हाच आहे, याकडे लक्ष वेधत त्यांनी कपिल शर्माच्या अटकेचीच मागणी केली. टूरिस्ट व्हिसा वापरून परदेशी कलाकार कपिल शर्माच्या शोमध्ये काम करतात, हेसुद्धा बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे आता मुख्यमंत्री याचीही चौकशी करणार का, असा प्रश्न त्यांनी फडणवीस यांना विचारला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा