साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा

September 9, 2016 8:52 PM0 commentsViews:

Sharad pawar2141

मुंबई – 09 सप्टेंबर :  राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते. सध्या साखर कारखानदारांना 15 हजार क्विंटल साखरसाठा करण्याची मुभा आहे. यासंदर्भात केंद्राला विनंती करु असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं. तसा प्रस्ताव राज्य सरकार केंद्राला पाठवणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

त्याचबरोबर, ऊस खरेदी कर माफ करावा अशी मागणी साखर संघानं केली, मात्र याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन बैठकीत देण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा