अवकाळी पावसाचे 7 बळी

April 16, 2010 2:11 PM0 commentsViews: 1

16 एप्रिलराज्यात विदर्भात कडक उन्हामुळे लोक हैराण झालेत. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज अवकाळी पावसाने सात बळी घेतले. उस्मानाबादमध्ये अंगावर वीज कोसळून एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले. हिंगोलीत वीज पडल्याने एका एसआरपी जवानाचा जागीच मृत्यू झाला. नांदेडमध्ये माहूर तालुक्यातील वाई बाजार इथे दोघेजण वीज पडून ठार झाले. बार्शीत वीज पडून अनिल चौधरी या वीज भट्टी कामगाराचा मृत्यू झाला. तर सांगोला तालुक्यात अकोला गावात वीज पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात कर्जत इथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. पुणे आणि जेजुरीत गारांचा जोरदार पाऊस झाला.सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार गारपीट झाली. कोल्हापूर शहर आणि परिसराला वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडीत झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. गडहिंग्लज, इचलकरंजी आणि पन्हाळा तालुक्यातही गारांसह पाऊस झाला. बेळगावातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही जोरदार वार्‍यासह पाऊस पडला. या पावसाने राज्यात ठिकठिकाणी आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान केले आहे.

close