सांगलीत एकाच कुटुंबातील चार महिलांची निर्घृण हत्या

September 10, 2016 12:53 PM0 commentsViews:

sangali_murderसांगली, 10 सप्टेंबर : जिल्ह्यात एकाच कुटुंबातल्या 4 जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यातला कोडण्णूर गावात घडलीये. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

कोडण्णूर गावात इरकर कुटुंबातील चार महिलांची मध्यरात्री धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आला. ज्या घरी हे खून झाले, त्या घरी फक्त महिलाच राहत होत्या. सुशीला कुंडलिक इरकर (60), सिंधुबाई भारत इरकर (40) यांच्यासह मुली रुपाली भारत इरकर (19), राणी भारत इरकर (वय-16) यांची हत्या करण्यात आलीये. जमिनीच्या वादातून हा गंभीर गुन्हा झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवतायेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा