सीमाभागातील मराठी बांधवांचा अनोखा पाहुणचार

April 16, 2010 2:28 PM0 commentsViews: 2

16 एप्रिल मुंबईच्या आझाद मैदानात शुक्रवारी आलेल्या सीमा भागातील आंदोलकांची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली. पण या मराठी बांधवांचा खास पाहुणचार केला तो पोलिसांनी. पोलिसांनी स्वत:च्या खर्चाने या आंदोलकांना जेवण पुरवले. महाराष्ट्र पोलिसांच्या या खास पाहुणाचाराने हे आंदोलक भारावून गेले. बेळगावसह सीमा भागातील 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीवर महाराष्ट्रातील जनतेचे आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे सीमावासियांचे हे आंदोलन सुरू आहे.

close