अॅट्राॅसिटी कुठल्याही परिस्थिती रद्द होणार नाही -रामदास आठवले

September 10, 2016 5:44 PM0 commentsViews:

सांगली, 10 सप्टेंबर : अॅट्राॅसिटी कायदा रद्द करावी या मागणीसाठी आंदोलनं होताय. मात्र अॅट्राॅसिटी कुठल्याही परिस्थिती रद्द होणार नाही असं सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ठणकावलंय. दलितांवर अन्याय झाला तर अॅट्राॅसिटी लागू होणारच असंही आठवलेंनी बजावलं.athavale_news

सर्व पक्ष आणि सांगलीकरांच्या वतीने आज सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत, रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला.

जेव्हा मराठा समाजातील लोकांनी दलितांवर आत्याचार केले होते, तेंव्हा आम्ही संपूर्ण मराठा समाजाला टार्गेट केलं नव्हतं, तुम्ही पण आता दलिताना टार्केट करू नका. मराठा समाज आणि दलित हे एकत्र राहणे हे गरजेचे आहे असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं. कोपर्डीतील आरोपीना कठोरात कठोर शासन व्हावं, पण कोपर्डी आणि अॅट्राॅसिटी याचा काही ही संबंध नाही, असंही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा