नागपुरात फुलला कूलर्सचा बाजार

April 16, 2010 2:33 PM0 commentsViews: 2

प्रशांत कोरटकर, नागपूर 16 एप्रिलनागपूरमध्ये उन्हाचा तडाखा लोकांना हैराण करून सोडत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत. या चार महिन्यात नागपूर मागणी वाढते, ती कूलर्सची…नागपूरच्या महात्मा फुले बाजारात आले की जिकडे-तिकडे विविधरंगी कूलर्स दिसतात. उन्हाळ्यापासून बचावासाठी कुलर स्वस्त आणि मस्त माध्यम आहे. मध्य भारतातील नागपूरचा हा कूलर बाजार दरवर्षी उन्हाळ्यात गजबजलेला असतो. कूलरच्या ताट्या वुडवूल पासून तयार केल्या जातात. लोक कूलरच्या खरेदीसाठी दूर दूरहून इथे येतात.कुलरचा गारवा घेण्यासाठी पाण्याची गरज असते. पण पाण्याची टंचाई असल्याने ही गार हवा घेण्यासाठी लोकांना पायपीट करावीच लागते. पण असे असले तरी हे कूलर्सच तापलेल्या उन्हात नागपूरकरांना दिलासा देत आहे.

close