‘फूँक – 2’चे चॅलेंज रामूने जिंकले

April 16, 2010 2:56 PM0 commentsViews: 2

16 एप्रिलफूँक सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच 'फूँक – 2' हा सिनेमा जो कोणी न घाबरता बघेल त्याला पाच लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा राम गोपाल वर्माने केली होती. हे आव्हान मुंबईच्या हितेश शर्मा याने स्वीकारले. सिनेमा बघताना ईसीजी मशीनद्वारे हितेशच्या हृदयाचे ठोके तपासले जात होते. अर्ध्या तासातच हितेश घाबरून थिएटरबाहेर आला.आणि रामूने हे चॅलेंज जिंकले. यावेळी राम गोपाल वर्माने थ्रीडी फूँक – 3चीही घोषणा केली. आणि त्यात हितेश शर्माला भूमिका देणार असल्याचेही सांगितले.

close