कपिलनंतर आता इरफान खानला बीएमसीची नोटीस

September 11, 2016 5:15 PM0 commentsViews:

actor-irfan-khan_3e1b8e1a-4198-11e6-8e05-c384b245cd95

11 सप्टेंबर : कपिल शर्मानंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीने नोटीस पाठवली आहे. अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीचा आरोप आहे की, इरफानने त्याच्या गोरेगाव इथल्या फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे. या अपार्टमेंटधील अनेकांना पालिकेने नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे इरफान जिथे राहतो त्याच इमारतीत कपिल शर्माचा देखील फ्लॅटआहे. कपिल शर्मा नवव्या मजल्यावर राहतो तर पाचव्या मजल्यावर इरफान राहतो.

2014 मध्ये त्यांना याबाबतची तक्रार मिळाली होती. त्यानुसार या दोघांच्याही घरातील एलिवेशन फीचर, डक्ट, कॉमन पॅसेज आणि पार्किंग या ठिकाणी केलेल्या बदलांसाठी पालिकेची परवानगी घेतली नसल्याचं या नोटीशीत स्पष्टपणे म्हंटलं आहे. त्यानंतर नोटीस पाठवण्यात आली होती.

आता याबाबतची ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा