शिवसेना गोव्याचे बंडखोर संघनेते सुभाष वेलिंगकरांच्या संपर्कात

September 11, 2016 7:40 PM0 commentsViews:

Velingkar and Raut

11 सप्टेंबर :  राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मानला जातो.गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न शिवसेनेच्या गोटातून सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि सुभाष वेलिंगकर यांच्यात गोव्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली असून संजय राऊत यांनीदेखील भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ काढू नये असेही शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शिवसेनेने खासदार संजय राऊत यांच्यावर गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आत्तापासूनच भाजपच्या आणि संघातील नाराज गटाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

वेलिंगकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडून गोवा प्रांताचा स्वतंत्र संघ स्थापन केला आहे. दरम्यान, वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली आज समर्थकांची सभा पार पडली. या जाहीर सभेत भाजपला पराभूत करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. या सभेला सुमारे 2 हजार लोकांची उपस्थिती होती. त्यामुळे वेलिंगकर यांचे बंड हे आगामी निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा