पक्षाने अविश्वास दाखवल्याने 40 वर्षांची तपश्चर्या धूळीस – खडसे

September 11, 2016 7:49 PM0 commentsViews:

BJP

11 सप्टेंबर : मंत्रीपद गमावल्याची सल काही केल्या खडसेंच्या मनातून जात नाहीये.  भोसरी जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळं अडचणीत आलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच पक्षावर थेट निशाणा साधला आहे. भाजपने अविश्वास दाखवल्यामुळे चाळीस वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळाल्याची भावना खडसेंनी बोलून दाखवली.

जळगावच्या फैजपूर इथे मनपा शाळेच्या शताब्दी वर्षपूतच्निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खडसे हे दोघे एकाच व्यासपीठावर आले होते.

यावेळी तावडे म्हणाले, की प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. मात्र, तावडेंच्या त्या वक्तव्यावरून एकनाथ खडसेंनी जोरदार टोला लगावला.  भाजपनं प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवला आणि माझी चाळीस वर्षांची तपश्चर्या वाया घालवली, असा टोला खडसेंनी हाणला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा