अपंग शिक्षकांवर उपासमारीची वेळ

April 16, 2010 3:06 PM0 commentsViews: 2

16 एप्रिलमहाराष्ट्र राज्य अपंग एकात्मिक शिक्षक आणि परिचारिकांना गेल्या 15 महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. थकीत वेतन मिळाले नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या शिक्षकांनी यावेळी दिला. महाराष्ट्र सध्या 575 शिक्षक आहेत. पण यांच्या मागण्याकडे सरकाराने अजूनही लक्ष दिलेले नाही.

close