पिंपरीत दुचाकीस्वाराने पोलिसाला उडवलं

September 12, 2016 12:44 PM0 commentsViews:

pimperi_police

पिंपरी चिंचवड, 12 सप्टेंबर : राज्यात पोलिसांवरचे हल्ले वाढतच चाललेत. आधी मुंबई, नाशिक, ठाणे आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये हल्ला झालाय. नाकाबंदी दरम्यान ट्रीपलसीट जाणार्‍या दुचारीस्वारांनी पोलिसाच्या अंगावर दुचाकी घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. सुरेश चपटे असं या पोलिसाचं नाव असून या घटनेत ते गंभीर जखमी झालेत. तर कल्याणमध्ये पोलिसावर लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मोशी टोलनाका इथं पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली होती. त्यावेळी दुचाकीवरुन ट्रीपल सीट जाणार्‍या दुचाकीस्वाराला पुण्याकडे जाणार्‍यांना चपटे यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र यावेळी थांबण्याऐवजी या आरोपींनी चपटे यांच्या अंगावर दुचाकी घातली. या घटनेत चपटे यांच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झालीये. दुचाकी चढवून आरोपी फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.