अमिताभ होणार प्रोफेसर

April 16, 2010 3:20 PM0 commentsViews: 2

16 एप्रिलअभिनेते अमिताभ बच्चन यांना सिनेमात आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. पाहतो. पण आता अमिताभ खर्‍या आयुष्यात प्रोफेसर बनणार आहेत. आणि तेही त्यांच्या आवडत्या शहरात, पुण्यात!पुण्यातील सिम्बॉयोसिस कॉलेजात बिग बी विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत. मध्यंतरी त्यांनी अमिरसिंग यांच्यासोबत सिम्बॉयोसिसला भेट दिली आणि तेथील विद्यार्थ्यांना यशाचे मंत्र सांगितले.आता त्यांना सिम्बॉयोसिसने त्यांना प्रोफेसर ऍमरेटर्स हे पद बहाल केले आहे. आणि बिग बीनेही ते स्वीकारले आहे. सुपरस्टारकडून धडे मिळणार असल्याने सिम्बॉयोसिसमधील विद्यार्थीही खूष आहेत.

close